•  उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांची कारवाई 

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव शहरातील तानाजी गल्ली, महाद्वार रोड येथे आचारसंहितेचे उल्लंघन करून अवैधरित्या गोवा बनावटीची दारू विक्री करणाऱ्या दुकानावर छापा घालून उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी विक्रेत्याला अटक केली. मंजुनाथ मालगौडा गिडगेरी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईत एकूण २२४.०७० लिटर गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपी मंजुनाथ मालगौडा गिडगेरी यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

उत्पादन शुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त, उत्पादन शुल्क सहआयुक्त, उत्पादन शुल्क उपायुक्त व उत्पादन शुल्क उपअधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव उपविभागाच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.