बेळगाव / प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने बेळगाव मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी आज रविवारी सकाळी माजी राज्यसभा सदस्य, केएलईचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर कोरे यांची भेट घेतली. कोरे यांच्या निवासस्थानी झालॆली आजची बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.
या भेटी दरम्यान दोन्ही नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनिती, प्रचार आणि विरोधकांशी सामना यावर चर्चा केली. अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार ॲड.अनिल बेनके उपस्थित होते.
0 Comments