बेळगाव : येथील हिंडलगा मध्यवर्ती कारागृहावर रविवारी सकाळी शहर पोलिसांनी छापा टाकला. कारागृहात सुरू असलेले अवैध धंदे रोखण्यासाठी शहर पोलिस उपायुक्त (कायदा व सुव्यवस्था) रोहन जगदीश यांच्या नेतृत्वाखाली 'पाच सहाय्यक पोलिस आयुक्त,पोलिस कर्मचारी आणि श्वान पथकाकडून तासाभराहून अधिक काळ कारागृहाची झडती घेण्यात आली.
त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना (कायदा व सुव्यवस्था) विभागाचे पोलिस उपायुक्त रोहन जगदीश म्हणाले, येथे तंबाखू आणि सिगारेटचे पॅक मिळतात. सुरक्षा असली तरी हे सगळे आत कसे जातात याचा तपास करावा लागेल,' असे त्यांनी स्पष्ट केले. अजून याठिकाणी मोबाईल सापडलेला नाही. पण मोबाईल चार्जर आणि एक ब्लूटूथ उपकरणही सापडले असून ते ताब्यात घेण्यात आले आहे.
हिंडलगा कारागृहात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. अलीकडे कैदी मोबाईल फोन आणि टीव्ही वापरत असल्याचे आरोप ऐकायला मिळत आहेत. एका कैद्याने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना फोन करून त्यांच्या जीवाला धोका दिल्याची घटनाही घडली आहे. या पार्श्वभूमीवर ही कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले.
0 Comments