• एपीएमसी पोलिसांची कारवाई 

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव शहरातील सदाशिवनगर व खडेबाजार येथे पार्क केलेल्या दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला एपीएमसी पोलिसांनी अटक केली. संजू मल्लाप्पा मेकली असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून १,३५,००० रू.किमतीच्या ४ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. 

सदाशिवनगर आणि खडेबाजार येथे पार्क केलेल्या दुचाकी चोरल्याच्या घटना घडल्यानंतर अशा दुचाकी चोरांना शोधण्याच्या सक्त सूचना पोलिस आयुक्त इडा मार्टिन यांनी दिल्या होत्या. त्यानंतर आरोपी संजू मल्लाप्पा मेकली याला पोलीस स्थानकात आणून चौकशी केली असता, त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. याप्रकरणी एपीएमसी स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.