•  २७.१५ लाखाची तीन वाहने जप्त
  • जिल्हा पोलिस अधिक्षक ऋषिकेश सोनवणे यांची पत्रकार परिषदेद्वारे माहिती 

विजयपूर / वार्ताहर 

विजयपूर जिल्ह्याच्या चडचणनजीक धुळखेड गावातील श्री भीमा शंकर सौहार्द सहकारी बँकेत चोरी करून १९ लाख ५५ हजार रुपयांची रोकड लंपास करून फरार झालेल्या सहा चोरट्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून २७.१५ लाखाची तीन वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती विजयपूरचे जिल्हा पोलिस अधिक्षक ऋषिकेश सोनवणे यांनी दिली. रविवारी झलकी पोलिस स्थानकात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आरोपींना पकडण्यासाठी इंडस्ट्रीज डीवायएसपी जगदीश एच.चडचण, सीपीआय एचडी मुल्ला आणि पीएसआय राघवेंद्र पोटा यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम तयार करण्यात आली आणि आरोपींना शोधण्यासाठी विस्तृत जाळे पसरविण्यात आले. अधिक्षकांनी सांगितले की, ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून एक महिंद्रा  पिकअप, एक कार, एक दुचाकी आणि दरोड्यात वापरलेले ६ मोबाईल व ७ लाख ६५ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. 

उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी सापळा रचण्यात आला आहे. यावेळी अतिरिक्त पोलिस अधिक्षक शंकर मारिहाळ, प्रा.एस.पी.शालू, सीपीआय एचडी मुल्ला, पोलीस हवालदार व कर्मचारी उपस्थित होते.