बेळगाव / प्रतिनिधी
चन्नम्मा सर्कल येथे सोमवारी केएसआरटीसी बसच्या मागील चाकाखाली सापडून एका 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. बेळगाव शहरात नेहमी वर्दळ असलेल्या चन्नम्मा चौकात आज सोमवारी सकाळी बसच्या चाकाखाली सापडल्याने एका वृद्ध महिला जागीच ठार झाली. बस चालवताना चालकाचा सिग्नल चुकल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.
परगावाहून बेळगाव शहरात आलेल्या वृद्धेचा यात मृत्यू झाला असून तिचे वय सुमारे 60 वर्षे आहे. डावीकडून उजवीकडे जात असताना बसची धडक बसून मागच्या चाकाखाली सापडल्याने तिचा मृत्यू झाला. वाहतूक उत्तर विभाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
0 Comments