• राष्ट्रीय काँग्रेसचे युवा कार्यकर्ते कृष्णगौडा पाटील यांच्या स्तुत्य उपक्रम 
(रुग्णांना फळे वाटप करताना कृष्णगौडा पाटील)

बेळगाव :  येथील राष्ट्रीय काँग्रेसचे युवा कार्यकर्ते कृष्णगौडा पाटील यांनी रविवारी सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्णांना फळांचे वाटप केले व त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी सदिच्छा व्यक्त केली. समाजसेवेच्या भावनेतून पाटील यांनी केलेल्या या उपक्रमाबद्दल रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.