कागवाड : येथील शिवानंद महाविद्यालयातील निवडणूक मस्टरिंग व डिमस्टरिंग केंद्रांना बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी शनिवारी भेट दिली.

त्यानंतर त्यांनी येथील तालुका पंचायत कार्यालय व तहसीलदार कार्यालयात दुष्काळ व निवडणुकांबाबत तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

यावेळी कागवाड तहसीलदार राजेश बुर्ली, तालुका पंचायतीचे मुख्याधिकारी प्रवीण पाटील, बीईओ एम.आर. मुंजे, सीडीपीओ संजीव सदलगी, नरेगा सहसंचालक   गोपाळ माळी, पंचायत राज सहसंचालक अन्सारी यांच्यासह विविध विभाग तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.