बेळगाव / प्रतिनिधी

सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या १७ वर्षांखालील मुलींच्या राज्यस्तरीय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत बेळगाव विभागाच्या संघाने विजेतेपद पटकाविले होते. या संघातील ११ खेळाडूंची ६७ व्या अखिल भारतीय राष्ट्रीय शालेय महिला क्रिकेट स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य संघात निवड झाली आहे. 

या संघातील निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार वनिता विद्यालय शाळेच्यावतीने शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. निर्मला सुनथ व क्रिकेट प्रशिक्षक नागराज भगवंतण्णावर यांच्या हस्ते झाला. झोया काजी, गिरिजा कदम, माही कंग्राळकर, ज्ञानेश्वरी धुडूम, अनुजा उंद्रे, मनस्वी अंगडी, कीर्तना अर्कशाली, भूमिका कम्मार, श्रेया पोटे, निधी पाटील, गार्गी बिलागीकर या मुलींचा सत्कार करण्यात आला. या सर्व मुली आगामी त्रिवेंद्रम केरळा येथे होणाऱ्या ६७ व्या स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय महिला क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणार आहेत.