- पाच हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात
रायबाग / वार्ताहर
ग्रामपंचायतीत ई-मालमत्ता उपलब्ध करून देण्यासाठी लाच मागणारा पीडीओ (ग्रामविकास अधिकारी) लोकायुक्तांच्या जाळ्यात सापडला आहे.रायबाग तालुक्यातील निडगुंदी ग्रामपंचायतीचे पीडीओ सदाशिव जयाप्पा कारगर या लोकायुक्त अधिकाऱ्यानेआर. एस. नगराळ गावातील गंगाव्वा हणमंत केंगण्णावर यांना हिस्सा नं. १/२ निडगुंदी ग्राम व्हीपीसी क्र. १४६ / १ या घराशी संबंधित ई-मालमत्ता फॉर्म ९ आणि ११ देण्यासाठी ५,००० रुपयांची लाच मागितली.
या पार्श्वभूमीवर गंगाव्वा केंगण्णावर यांचा मुलगा अप्पासाब उर्फ अप्पाण्णा हणमंत केंगण्णावर यांनी लोकायुक्त पोलिस स्थानकात फिर्याद दिली. सदर फिर्यादीच्या आधारे लोकायुक्त पोलिस अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आणि छापा टाकून रायबाग शहरातील सत्यगौडाभैरप्पा कित्तूर याला तक्रारदार अप्पासाब केंगण्णावर यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना अटक केली.
लोकायुक्त पोलीस अधिक्षक हणमंतराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ए. आर. कलादगी, आर.एल.धर्मट्टी,निरंजन पाटील, कर्मचारी एल. एस. होसमनी, विजय बिराजनवर, रवी, आर.बी.गोकाक, संतोष ,गिरीश पाटील यांनी कारवाईत सहभाग घेतला.
0 Comments