•  शहर म. ए. समितीच्या बैठकीत निर्णय

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीची सर्वसमावेशक, विस्तृत व भक्कम कार्यकारिणी करण्यासाठी बेळगाव दक्षिण आणि उत्तर मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी नावे द्यावीत, असे आवाहन मराठा मंदिर येथे रविवार दि. ४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या शहर समितीच्या बैठकीत करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे ज्येष्ठ नेते रणजित चव्हाण-पाटील होते. समितीचे संघटन बळकट होणे काळाची गरज आहे. त्यामुळे विस्तारित कार्यकारिणी तयार करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांतून होत आहे. त्यामुळे बेळगाव दक्षिण-उत्तर मतदारसंघातील गल्ली व गावांमधील कार्यकर्त्यांना घेऊन कार्यकारिणी तयार करणे आवश्यक आहे. त्यामुळे वेगवेगळ्या भागांतील कार्यकर्त्यांनी नावे द्यावीत. कार्यकर्त्यांची नावे आल्यानंतर पुन्हा व्यापक चर्चा करून निर्णय घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले जाईल, अशी माहिती चव्हाण पाटील यांनी दिली.

महादेव पाटील यांनी प्रास्तविक केले. कार्यकर्त्यांना वाव मिळावा यासाठी नवीन कार्यकारिणी तयार करावी, अशी मागणी होत होती. कार्यकर्त्यांना सामावून घेऊन व्यापक कार्यकारिणी करण्यात येईल, अशी माहिती महादेव पाटील यांनी दिली.

रमाकांत कोंडूस्कर म्हणाले की, सीमालढ्याला निश्चित दिशा देण्यासाठी नियोजनपूर्वक पावले उचलण्याची गरज आहे. कार्यकर्त्यांची मते लक्षात घेऊन तसा निर्णय घेतला जाईल.

यावेळी गुणवंत पाटील, सतीश पाटील, राजू पावले. सागर पाटील, नितीन खन्नकर, रवी साळुंखे, अनिल पाटील, दत्ता जाधव, ज्ञानेश्वर मन्नूरकर, मोतेश बारदेशकर, राजू बिर्जे, प्रशांत भातकांडे, अंकुश केसरकर, गणेश दड्डीकर, आदींनी आपले विचार मांडले.

बैठकीला विकास कलघटगी, चंद्रकांत कोंडुसकर, शंकर बाबली, सुनील बोकडे, रमेश मेणसे, भाऊराव पाटील, नारायण केसरकर, संतोष कृष्णाचे, किरण धामणेकर, अनंत पाटील, आकाश भेकणे, बाळू, जोशी, अभिजीत मजुकर, अजित जुवेकर, मोहन पाटील, उमेश पाटील, किरण हुद्दार, केदारी करडी, अनिल अमरोळे, बाबू कोले, धनंजय पाटील, श्रीधर खन्नूकर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.