- बेळगाव ग्रामीण भाजप मंडळ कार्यालयामध्ये "ग्राम चलो" अभियानाची महत्त्वाची बैठक
बेळगाव / प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशामध्ये ग्राम चलो अभियानाला सुरुवात झाली आहे. ग्रामीण मंडळ मध्ये संघटनेला मजबूत बनविण्यासाठी विस्तारक व संयोजक म्हणून नेमलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जबाबदारी सोपविलेल्या गावामध्ये एक दिवस पूर्ण २४ तास राहून बूथ कमिटी बैठक, लाभार्थ्यांना तसेच गावातील समाज प्रमुखांना संपर्क तसेच ग्रामवास्तव्य या माध्यमातून येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये 400+ खासदार निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकतीनिशी उतरून, राष्ट्रबांधणीच्या या कार्यामध्ये आम्ही खारीचा वाटा उचलुया असे आवाहन बेळगाव ग्रामीण भाजपचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी केले.
भाजप बेळगाव ग्रामीण मंडळ कार्यालयामध्ये आज रविवार दि. ४ फेब्रुवारी रोजी "ग्राम चलो" अभियानाची महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत कार्यकार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर भाजपा बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष युवराज जाधव, जिल्हा खजिनदार मल्लिकार्जुन माद्दन्नावर, बेळगाव नगरसेविका विणा विजापुरे, अभियानाचे जिल्हा संचालक गुरु मेटगुड, ग्रामीण माजी आमदार मनोहर कडोलकर आदि उपस्थित होते.
याप्रसंगी ग्रामीण मंडळ मधून केंद्र सरकार तर्फे रेल्वे खात्यामध्ये सल्लागार समितीवर सल्लागार म्हणून प्रदीप पाटील, मल्लाप्पा कांबळे, तीप्पाजी मोरे, रामाप्पा कलभावी, अर्जुन डोंबले आदींची निवड झाल्याबद्दल भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर मार्गदर्शन करताना बेळगावच्या खासदार मंगला अंगडी म्हणाल्या विस्तारक म्हणून दुसऱ्या गावात जाणे आणि पक्षासाठी वेळ देणे खुप महत्त्वाचे आहे, बेळगावमध्ये पुन्हा भाजपचा खासदार निवडून आणुया असे त्यांनी सांगितले. यावेळी नूतन भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनीही विचार मांडले.
प्रारंभी खा.मंगला अंगडी, बेळगाव ग्रामीण भाजपचे अध्यक्ष धनंजय जाधव, ग्रामीण भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. पंकज घाडी यांनी अतिथिंचे स्वागत केले तर सिद्धप्पा हुक्केरी यांनी सूत्रसंचालन केले. या बैठकीला भाजपचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments