- भेटीदरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बेळगाव लोकसभा क्षेत्राबाबत सविस्तर चर्चा
बेळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव ग्रामीण भाजपचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी दिल्लीतील भाजपच्या जेष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. यामध्ये केंद्रीय खाण व अवजड उद्योगमंत्री तसेच संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची त्यांच्या कार्यालयात तर भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय संघटन महामंत्री बी.एल.संतोष यांची दिल्ली येथील भारतीय जनता पार्टी मुख्यालयमध्ये भेट घेण्यात आली.
या भेटीदरम्यान बेळगाव लोकसभा क्षेत्राबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव व महाशक्ती केंद्र प्रमुख प्रदीप पाटील उपस्थित होते.
0 Comments