बेळगाव : दरवर्षीप्रमाणे यंदाही सीमाप्रश्नी बलिदान दिलेल्या शिवसेनेच्या ६७ हुतात्म्यांना शिवसेना (ठाकरे गट सीमाभाग) बेळगाव यांच्यातर्फे अभिवादन करण्यात आले. आज गुरुवारी सकाळी शहरातील रामलिंगखिंड गल्ली सम्राट अशोक चौक येथे हा कार्यक्रम गांभीर्याने पार पडला.

याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांच्याहस्ते पुष्पहार घालून शिवसेनेच्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली याप्रसंगी शिवसेना उपशहर प्रमुख राजू तुडयेकर, प्रकाश राऊत, संघटक तानाजी पावशे, युवा सेनेचे विनायक हुलजी, प्रकाश हेब्बाजी, वैभव कामत, अवेध्द चव्हाण -पाटील, सुवैध्द पवनशट्टी आदींसह बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.