बेळगाव : विद्यार्थ्यांना पोलिसांचे मूलभूत काम आणि कायद्यांचे ज्ञान देण्याच्या उद्देशाने बेळगाव शहर पोलिस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी अभिनव उपक्रम राबविला आहे.
बेळगाव पोलीस आयुक्तालयात या उपक्रमाचा श्रीगणेशा करण्यात आला. बेळगाव शहरसह, टिळकवाडी, कॅम्प, खडेबाजार शहापूर, माळमारुती स्थानकांमध्ये या उपक्रमाची सुरुवात झाली. यामध्ये प्रत्येक पोलिस ठाण्यातून १० पदवीधर विद्यार्थ्यांची निवड केली जाईल आणि त्या विद्यार्थ्यांना एक महिन्यासाठी मूलभूत पोलिसिंग, ऑनलाईन फसवणूक, ऑनलाइन धमक्या, आयपीसी, सीआरपीसी आणि महिला आणि बाल कायद्याची ओळख करून दिली जाईल.
यावेळी शहर पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा, उपायुक्त रोहन जगदीश, स्नेहा पी. व्ही. व पोलीस अधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.