- बेळगाव तालुका विविध कार्यकारी संघातर्फे बांधण्यात येतेय इमारत
सुळगा (हिं.) / वार्ताहर
सुळगा (हिं.) येथील बेळगाव तालुका विविध कार्यकारी संघ पुरस्कृत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा केंद्र आणि सांस्कृतिक मंच बांधण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा केंद्र आणि सांस्कृतिक मंचच्या माध्यमातून गेल्या १६ वर्षांपासून बेळगाव तालुका विविध कार्यकारी संघातर्फे विविध कार्यक्रम सांस्कृतिक आणि क्रीडास्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. त्यामुळे सदर मंचसाठी गावात वास्तू असावी अशी संस्थेची इच्छा होती. त्या संकल्पनेतून ही इमारत साकारली जात आहे.
या नूतन इमारतीचा स्लॅबभरणी कार्यक्रम मंगळवार दि. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वा. बेळगाव - वेंगुर्ला मार्गावर सुळगा (हिं.) येथे पार पडला. बेळगाव तालुका विविध कार्यकारी सहकारी संघाचे संस्थापक,अध्यक्ष अशोक यल्लाप्पा पाटील हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
प्रारंभी संघाचे संस्थापक, अध्यक्ष अशोक यल्लाप्पा पाटील, मराठी संवर्धन सांस्कृतिक संघाचे अध्यक्ष शिवाजी अतिवाडकर, संघाचे उपाध्यक्ष बसवंत एन. बेनके, संचालक लक्ष्मण ब. खांडेकर, निंगाप्पा दु. देसुरकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच अयोध्या येथे नुकत्याच पार पडलेल्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर हिंदू धर्माचे प्रतीक असलेल्या भगव्या ध्वजाचे पूजन करण्यात आले.
यानंतर मराठी संवर्धन सांस्कृतिक संघाचे अध्यक्ष शिवाजी अतिवाडकर यांनी श्रीफळ वाढविले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा केंद्र - सांस्कृतिक मंचच्या फलकाचेही अनावरण करण्यात आले.
यानंतर इमारतीच्या स्लॅब भरणीला प्रारंभ करण्यात आला. तत्पूर्वी संघाचे जेष्ठ संचालक लक्ष्मण ब. खांडेकर यांच्याहस्ते मशीनचे पूजन करण्यात आले. तर संचालक निंगाप्पा दु. देसुरकर यांनी श्रीफळ वाढविले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा संघाच्या सल्लागार मंडळाचे सदस्य प्रकाश बेळगुंदकर यांनी केले.
याप्रसंगी संचालक शिवाजी गा. पाटील, संचालक यल्लाप्पा भ. पाटील, संघाच्या सल्लागार मंडळाचे सदस्य तथा साई प्लायवूड्सचे प्रोपरायटर परशराम य. कदम, टोपाण्णा प. पाटील, मारुती ना. पाटील, देवस्की पंच लक्ष्मण कोवाडकर, इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर सुरज अशोक पाटील, मुख्य व्यवस्थापक एन. वाय. चौगुले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक हरिभाऊ कलखांबकर, पत्रकार एन.ओ.चौगुले, रोहन बाळासाहेब पाटील यांच्यासह संघाचे पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments