विजयपूर / वार्ताहर 

विजयपूर शहरातील शिकारखाना कॉलनीत एका कॅन्टीनमध्ये १४ वर्षाच्या शालेय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अद्याप सदर विद्यार्थ्यांची ओळख पटली नसून त्याच्या आत्महत्येचे कारणही स्पष्ट झालेले नाही. दरम्यान घटनेची माहिती मिळताच गोलघुमट पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी विजयपूरच्या सरकारी रुग्णालयात पाठविला आहे.या घटनेची नोंद गोलघुमट पोलिस स्थानकात झाली असून पोलिसांचे ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.