विजयपूर / वार्ताहर
कार व सायकलची धडक होऊन झालेल्या अपघातात सायकलस्वार गंभीर जखमी झाला. विजयपूर शहरातील गांधीचौक सर्कल येथे बुधवारी ही घटना घडली. जखमी सायकलस्वाराला अधिक उपचारासाठी विजयपूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार कार क्रमांक KA- 28 Z 2707 च्या चालकाचा ताबा सुटल्याने सायकलला धडक दिली. या अपघातात सायकलसह कारचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर कारचालक घटनास्थळी कार सोडून फरार झाला आहे. या घटनेची नोंद विजयपूरच्या वाहतूक पोलिस स्थानकात झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
0 Comments