विजयपूर : केएसआरटीसी परिवहनची बस आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. मात्र बसमधील सर्व प्रवासी बचावल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. विजयपूर जिल्ह्याच्या सिंदगी तालुक्यातील गबसवलगी ते हंचिनाळ मार्गावर ही घटना घडली. अपघातावेळी ही बस मोरतगीहून सिंदगीकडे निघाली होती. 

या अपघातानंतर बसमध्ये एक दुचाकी सापडल्याने बसने पेट घेतला. तसेच या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. दुचाकीस्वाराचे नाव व अन्य माहिती उपलब्ध नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी पेटलेल्या बसच्या आगीवर नियंत्रण मिळवले. ही घटना सिंदगी पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली.