• हिरेबागेवाडी पोलिसांची कारवाई 

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगावातील अनेक पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद असलेला आरोपी अब्दुलगनी शब्बीर शेख हा आज जेएमएफसी न्यायालयाच्या आवारातून पोलिसांना हुलकावणी देऊन पळून गेला होता. मात्र अवघ्या चार तासात सदर आरोपीच्या पुन्हा मुसक्या आवळण्यात बागेवाडी पोलिसांना यश आले आहे. याबाबतची समजलेली माहिती अशी की, टिळकवाडी पोलिसांनी अब्दुलगनी शब्बीर शेख याला खटल्याच्या पहिल्या सुनावणीसाठी जेएमएफसी न्यायालयात आणले असता तो तेथून पळून गेला त्यानंतर तो हिरेबागेवाडी येथील मुस्लिम गल्लीत बसला होता. तेव्हा बागेवाडी पोलीस स्थानकाचे पीएसआय अविनाश यारागोप्पा यांच्या नेतृत्वाखाली शोध सुरू केला व काही तासातच सदर आरोपी पोलिसांच्या हाती लागला बागेवाडीचे पीएसआय अविनाश यारगोप्पा, सहकारी नागाप्पा सुतगट्टी आणि बाबण्णा यांनी या चोरट्याला पुन्हा पकडण्यात यश मिळविले, अशी माहिती शहर पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा यांनी दिली.