• दलित संघर्ष समिती जिल्हा शाखेतर्फे बेळगावात निदर्शने 

 बेळगाव / प्रतिनिधी

गोकाक वनविभागाचे उपसंरक्षक शिवानंद नायकवडी यांनी रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे यांचा अर्वाच्य भाषेत एकेरी उल्लेख करून अवमान केला आहे. त्याचा निषेध करत आज दलित संघर्ष समितीच्या जिल्हा शाखेतर्फे बेळगावात निदर्शने करण्यात आली.

यावेळी संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी दलित संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी केली.

याबाबत प्रसार माध्यमांना माहिती देताना संघटनेच्या नेत्यांनी, दुर्योधन ऐहोळे यांना एकेरी बोलून लोकप्रतिनिधींचा अवमान केला आहे. ऐहोळे यांनी जनतेच्या हिताबाबत वनाधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, त्यांना एकेरी बोलणाऱ्या उपवनसंरक्षक शिवानंद नायकवडी यांचा राजीनामा घ्यावा किंवा वनमंत्र्यांनी त्यांना निलंबित करावे अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी गीता सुन्नक्की, सतीश हरिजन, वीरभद्र मैलन्नावर, विठ्ठल सुन्नक्की, बसप्पा तळवार, सुंदरव्वा कट्टीमनी, शांतव्वा वंटगुडी आदि उपस्थित होते.