बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरातील वाढती वाहतूक पाहता आगामी काळात वाहतूक कोंडी टाळून वाहतूक सुरळीत करता यावी यासाठी राष्ट्रीय महामार्गापासून ते चन्नम्मा चौकापर्यंत उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज पत्रकारांशी संवाद साधून नियोजित उड्डाणपुलाची माहिती दिली. ते म्हणाले की, गांधीनगरजवळ राष्ट्रीय महामार्ग ते संकम हॉटेल, अशोक सर्कल, आर.टी.ओ. सर्कल मार्गे कित्तूर चन्नम्मा सर्कलपर्यंत उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. अशोक सर्कल आणि कित्तूर चेन्नम्मा सर्कल येथे वाहनांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी "रोटरी" बांधण्यात येईल. अशोक सर्कल येथे सीबीटी बस स्टँडजवळ एक उतार, एक उतार आरटीओ चौकाच्या बाजूने आणि दुसरा उतार महांतेश नगर बाजूच्या रस्त्याला जोडेल. त्याचप्रमाणे आरटीओ चौकातही तीन रॅम्प असतील. या उड्डाण पुलाला चन्नम्मा सर्कल, कृष्णा देवराय सर्कल, कोल्हापूर सर्कल आणि बसस्थानक जोडले जातील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
0 Comments