विजयपूर / वार्ताहर 

विजयपुरात रात्री उशिरा भूकंपाचे दोन धक्के बसले, रिश्टर स्केलवर 2.9 तीव्रतेचा हादरा नोंदवला गेला. शहरासह जिल्ह्यातील काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. बसवनबागेवाडी तालुक्यातील मनगुळी भागात पुन्हा जमीन हादरली. दुपारी 12.22 आणि त्यानंतर 1.20 वाजता पृथ्वी हादरली. हा भूकंप पाच किमी खोलीवर झाल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.