बेळगाव : अक्कलकोटहून निघालेल्या आणि काल बेळगावात आगमन झालेल्या स्वामी समर्थांच्या पालखीचे आज सायंकाळी महाद्वार रोड येथील श्री स्वामी समर्थ आराधना केंद्राच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.
बेळगावच्या खासदार श्रीमती मंगला अंगडी यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून आणि अनंत लाड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पालखीला सायंकाळी साडेपाच वाजता सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पालखी महाद्वार रोड इथून वाजत गाजत निघून भांदूर गल्ली मधून हेतू कलानी चौकाकडून तासिलदार गल्ली, तानाजी गल्ली अशी परिक्रमा करीत पालखी रात्री आराधना केंद्राकडे येऊन विसावली. तिथे हजारो स्त्री-पुरुष भक्तांनी भेट देऊन पादुकांचे दर्शन घेतले. पालखी मार्गावर अनेक ठिकाणी पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच महिलांनी ओवाळणी केली. त्यानंतर उपस्थित सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
ही पालखी परिक्रमा यशस्वी पार पाडावी यासाठी आराधना केंद्राचे अध्यक्ष नारायण पाटील, सुनिल चौगुले, विकास मजुकर, बुडाचे माजी अध्यक्ष संजय बेळगावकर, राजू गोजगेकर, मधु गुरव, रवी मोरे, संजय सुळगेकर, श्रीपाद पाटील, अनिल शहा, प्रसाद नार्वेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी नगरसेविका नेत्रावती भागवत, याचबरोबर मीना बेनके, विजया चौगुले, पूजा गुरव, माजी नगरसेविका वैशाली हूलजी, बाळू पाटील, राहुल मुचंडी, चेतन चौगुले, संजय बर्डे, आदी उपस्थित होते.
पालखीच्या अग्रभागी बसवाणी बँड, ढोल पथक, जुना भाजी मार्केट व ज्योती नगर कंग्राळी येथील भजनी मंडळे सहभागी झाली होती.
0 Comments