• चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात
  • अपघातानंतर चालकाचे पलायन

विजयपूर / वार्ताहर 

भरधाव वेगातील ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक थेट रस्त्या नजीकच्या फुटपाथवर चढला आणि नंतर थेट दुकानात शिरला. विजयपूर जिल्ह्याच्या बसवण बागेवाडी गावात बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली मात्र दुकानातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

अपघातग्रस्त ट्रक बसवण बागेवाडीहून मुद्देबिहाळकडे जात होता. अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळी ट्रक सोडून पलायन केले. अपघाताची माहिती मिळताच बसवण बागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी होत ट्रक ताब्यात घेतला. या घटनेची नोंद बसवण बागेवाडी पोलिस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.