खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्याच्या बिडी परिसरातील मुगळीहाळ व कडतन बागेवाडी येथे आज शनिवार दि. २३ डिसेंबर २०२३ रोजी तालुका आरोग्य अधिकारी (THO) डॉ. बसवराज किडसन्नावर यांच्या नेतृत्वाखालील आरोग्य पथकाने खाजगी दवाखान्यांना अचानक भेट देऊन तपासणी केली व केपीएमई कायद्यांतर्गत नोंदणी नसलेल्या अनेक अनधिकृत दवाखान्यांना ताळे ठोकण्यात आले.
यावेळी केपीएमई कायदा आणि जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यासाठी बीडी गावाच्या परिसरातील इतर दवाखान्यांना भेट देऊन पाहणी करण्यात आली.
0 Comments