- गोकाक कलाल गल्लीतील घटना
गोकाक / वार्ताहर
बेळगाव कंग्राळ गल्लीत ड्रेनेज चेंबरमध्ये सुमारे तीन महिन्यांचे मृत अर्भक आढळून आल्याची घटना ताजी असतानाच आज रविवार दि. २४ डिसेंबर २०२३ रोजी गोकाक शहरातील कलाल गल्लीत एक नवजात अर्भक मृतावस्थेत गटारीत आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, आज पहाटे प्लॅस्टिकच्या पिशवीतून कोणीतरी वस्तू गटारीत फेकल्याचे येथील स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास आले. त्यांनी प्लॅस्टिक पिशवी उघडली असता त्यांना एका नवजात अर्भकाचा मृतदेह आढळून आला. नवजात अर्भकाचा मृतदेह आढळल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. दरम्यान घटनेची माहिती मिळताच घटप्रभा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेची नोंद घटप्रभा पोलिस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
0 Comments