•  सुदैवाने जीवितहानी टळली 

बेळगाव : गोव्याहून यादवाडला सिमेंट फॅक्टरी करता खडी घेऊन जाणारा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्या नजीकच्या ट्रान्सफॉर्मरला धडकून तो उलटला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. रविवारी सकाळी ८ वा. सुमारास, (केए - २२, डी ९३६३) या क्रमांकाचा ट्रक गोवा येथून खडी घेऊन यादवाड येथील सिमेंट फॅक्टरीला जात होता. हा ट्रक बेळगाव येथील मुतगा या गावी आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पलटी झाला व रस्त्याशेजारील ट्रान्सफॉर्मरला हा ट्रक धडकला. घटनेनंतर लागलीच ट्रक चालक व इतर वाहनातून वेळीच बाहेर पडले. या अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.