विजयपुर : येथील ज्येष्ठ समाज सेविका अलकाताई शिशीर जोशी (वय ७०) यांचे अल्पशा आजाराने आज रविवार दि. १७ डिसेंबर २०२३ रोजी रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे, सूना आणि नातवंडे असा परिवार आहे.
विजयपुरातील बामो ऑप्टीशियन आणि स्पोर्ट्स हा व्यवसाय त्यांनी समर्थपणे सांभाळला.अनेक गरजुनां त्यांनी मदत केली आहे.रोटरी इनरव्हिल या समाजसेवी संस्थेत त्या बरीच वर्षे सक्रिय होत्या.
चित्पावन ब्राह्मण संघ विजयपुर या संघाच्या त्या संस्थापक सदस्य होत्या. मुंबई विद्यापीठाच्या त्या पदवीधर असून, त्यांनी अनेक शाळांना मोफत शैक्षणिक साहित्य पुरविले आहे.
0 Comments