बेळगाव : बेळगाव पोलिस विभागातील सहाय्यक पोलिस आयुक्त एन.व्ही.बरमनी यांनी आज धारवाडच्या अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख पदाचा पदभार स्वीकारला.

राज्य सरकारने नुकतीच सहाय्यक पोलिस आयुक्त पदावरून धारवाडच्या अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुखपदी त्यांना बढती दिली आहे. एन.व्ही.बरमनी यांनी बेळगाव पोलिस विभागात अनेक वर्षे पोलिस निरीक्षक, पोलिस उपअधिक्षक तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त पदावर सेवा बजावली आहे.