• ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक डॉ. भरत पाटणकर यांचे प्रतिपादन 
  • पुरस्कार वितरण सोहळा व विशेष व्याख्यान संपन्न
  • राष्ट्रवीरकार शामराव देसाई सामाजिक संस्था बेळगांव,द .म. शि. मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन 

बेळगाव / प्रतिनिधी 

स्वतः तुम्ही प्रकाश व्हा असा संदेश गौतम बुद्ध यांनी जगाला दिला. सारासार विवेकबुद्धीचा विचार जीवनात उतरवायला हवा. राष्ट्रवीर शामराव देसाईंनी बहुजन समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य केले. वेळोवेळी आपल्या लेखनातून समाजात क्रांतीकारी परिवर्तन घडवून आणले. सत्यशोधक विचार समाजात बिंबविण्यासाठी  वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. दुःख मुक्त होण्याचे सुप्न कार्ल मार्क्स, गौतम बुद्ध, संत तुकाराम, संत कबीर यासह अनेक थोर महामानवानी सांगून गेले आहेत तेच विचार  शिव , शाहू, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रखडतेने विचार यांनी  मांडला. जातीव्यवस्था नष्ट केली. शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले. धार्मिक गुलामगिरी, भांडवल शही, संयुक्त महाराष्ट्र, चळवळ, गोवा मुक्ती चळवळ, सीमावाद आंदोलन, अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षणात तंत्रज्ञानाची जोड, कडाडून सावकरीला विरोध, वेळोवेळी लेखनातून समाजात क्रांतीकारी बदल घडवून आणण्यासाठी महात्मा जोतिबा फुले यांनी कार्य केले  हेच विचार राष्ट्रवीर  शामराव देसाईंनी केले बहुजन समाजाचे नेतृत्व पुढे घेऊन गेले आहेत.आज फोफावलेल्या मनुवाद निपटून काढण्यासाठी आज सत्यशोधक विचाराची गरज निर्माण झाली आहे. सत्यशोधक समाजाचे पुनर्जीवित,पुनःर्जिवित करायला आहे. महात्मा जोतिबा फुले यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी समाजाने जागरूक राहणे अत्यंत गरजेचे आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक डॉ. भरत पाटणकर यांनी पुरस्काराला उत्तर देत असताना सांगितले.

राष्ट्रवीरकार शामराव देसाई पुरस्कार समिती बेळगाव, राष्ट्रविरकार शामराव देसाई सामाजिक संस्था बेळगांव , देसाई कुटुंबीय आणि दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार वितरण सोहळा व विशेष व्याख्यान ज्योती महाविद्यालय व  भाऊराव काकतकर  महाविद्यालयाच्या  सभागृहात सोमवार दिनांक ११  डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता कार्यक्रम मोठया थाटात पार पडला.

 कार्यक्रमांचे अध्यक्ष कायदे तज्ञ  द. म. शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते ॲड. राजाभाऊ पाटील उपस्थित होते.व्यासपीठावर  यंदाचा राष्ट्रवीरकार शामराव देसाई यांच्या नावाने  दिला जाणारा पुरस्कार प्रमुख वक्ते आणि मार्गदर्शक तसेच पुरोगामी चळवळीचे नेते  ज्येष्ठ विचारवंत लेखक डॉ. भरत पाटणकर यांना  २५,०००/- हजार स्मृतिचिन्ह पुष्पगुच्छ ग्रंथ देऊन  मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.  

यावेळी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती कोल्हापूर येथील  इतिहास संषोधक विचारवंत  साहित्यिका डॉ. मंजुश्री जयसिंगराव पवार, माजी प्राचार्य डॉ आनंद मेणसे,  माजी प्राचार्य आनंद देसाई,  संस्थेचे सचिव प्रा. विक्रम पाटील, सहसचिव डॉ. दिपक देसाई  उपस्थित होते.

मराठी विद्यानिकेतन शाळेच्या शिक्षिका नीला आपटे यांनी ईशस्तवन व स्वागगीत क्रांतिकारी गीत सादर केले. स्वागत व प्रास्ताविक व शामराव देसाई यांच्या जीवनकार्य यांच्या जीवनावर कोल्हापूर येथील  विचारवंत मंजुश्री पवार यांनी मांडले.  परिचय जीएसएस महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. आनंद मेणसे यांनी करून दिला.

सुत्रसंचलन व आभार प्रा. एस.व्ही.पाटील यांनीयांनी मानले. यावेळी प्राचार्य डॉ. एस. एन.पाटील, प्राचार्य आनंद पाटील, प्राचार्य. आर. डी. शेलार, प्राचार्य बसवराज कोळूचे, प्रा. एम. बी. निर्मळकर, रघुनाथ बांडगी, पी.पी.बेळगावकर, माजी आमदार दिंगबर पाटील, ॲड. नागेश सातेरी, प्रा. निलेश शिंदे,  अनिल कणबरकर, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आर. वाय. पाटील ,शिवाजी देसाई, माजी नगरसेवक अनिल पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र मोदगेकर, एस. एल. चौगुले, दीपक पावशे यासह संस्थांचे पदाधिकारी सदस्य प्राध्यापक कर्मचारी शिक्षक, विद्यार्थी, पालक रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.