बेळगाव : मूळचे बेकीनकेरे (ता. बेळगाव) व सध्या शास्त्रीनगर येथील रहिवासी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते, विश्वभारत शिक्षण संस्थेचे निवृत्त शिक्षक रामचंद्र ओमाना बिर्जे (वय वर्षे ८३) यांचे आज मंगळवार दिनांक १२ रोजी निधन झाले. पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगी, दोन विवाहित मुलगे, जावई, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे वकील महेश बिर्जे यांचे ते वडील होत. मंगळवार दिनांक १२ रोजी रात्री ठीक ८.३० वाजता शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.
0 Comments