बेळगाव :  हुबळी - धारवाड, गुलबर्गा आणि बेळगाव महापालिका क्षेत्रात निवासी भागांमध्ये नियमित पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा करण्यासाठी कर्नाटक अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट अँड फायनान्स कार्पोरेशन एल अँड टी संस्थेकडे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र या संस्थेचे काम असमाधानकारक असल्याचे मत, नगरविकास मंत्री बी.एस.सुरेश यांनी व्यक्त केले आहे. 

जागतिक बँक कर्नाटक नागरी पुरवठा आधुनिकरण प्रकल्प आढावा बैठकीत मंत्री सुरेश यांनी एल अँड टी च्या तीन शहरातील पिण्याच्या पाण्याच्या कामासंदर्भात सविस्तर माहिती घेऊन,कंपनीचे काम असमाधान करत असल्याचे मत व्यक्त केले. त्याचबरोबर पुढील एका महिन्यात पुन्हा आढावा बैठक घेण्यात येईल, तेव्हा कामात सुधारणा आढळून न आल्यास कारवाई हाती घ्यावी लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.