- गीताज लवडेल नर्सरीत महिला पालकांसाठी कोरीव काम व रांगोळी स्पर्धा संपन्न
सुळगा (हिं.) / वार्ताहर
पालकांना कला सादर करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने हिंडलगा दाजीबा देसाई मार्गावरील गीताज लव्हडेल नर्सरीत महिला पालकांसाठी फळे आणि भाज्यांचे कोरीव काम करून कलाकृती बनवणे यासह रांगोळी स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेला महिला पालकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. सदर स्पर्धेला प्रमुख पाहुण्या म्हूणन नेहा कबटे उपस्थित होत्या.
फळे आणि भाज्यांचे कोरीव काम करून कलाकृती बनविण्याच्या स्पर्धेत महिला पालकांनी विविध आकर्षक कलाकृती साकारल्या होत्या.
त्यामध्ये रेल्वेसह मासा, खेकडा यासारख्या विविध जलचरांच्या प्रतिकृतींचा समावेश होता. तर रांगोळी स्पर्धेतही माता पालकांनी रेखाटलेल्या व्यक्तिचित्र, ठिपक्यांच्या, सामाजिक संदेश देणाऱ्या आणि संस्कृती जोपासणाऱ्या विविध रांगोळ्या लक्षवेधी ठरल्या.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षिका - महिला शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. शिक्षिकांनी केलेले नियोजन आणि पालकांच्या सहभागामुळे स्पर्धा सुरळीत पार पडली.
0 Comments