बेळगाव / प्रतिनिधी

केंद्र सरकारने शुक्रवारी बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नूतन सीईओ म्हणून जबलपूरचे एडिशनल डीईओ राजीव कुमार यांची नियुक्ती केली आहे. ते सन २०१३ अधिकारी असून सध्या जबलापूर येथे डीईओ म्हणून सेवा बजावित आहेत. येत्या दोन दिवसात ते आपला पदभार स्वीकारणार आहेत. बेळगाव कॅन्टोन्मेंट विभागाला केंद्र सरकारने त्यांच्या नावाचे प्रतिज्ञापत्र पाठवले आहे.

बेळगाव कॅन्टोन्मेंटचे सीईओ के. आनंद यांनी आत्महत्या केल्यानंतर केंद्र सरकारने प्रभारी सीईओ म्हणून अजित रेड्डी यांना तात्पुरता पदभार स्वीकारण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशानुसार दोन दिवसांपूर्वीच हजर होऊन त्यांनी पदभार स्वीकारला होता.

मात्र शुक्रवार दि. १ डिसेंबर २०२३ रोजी पुन्हा नव्याने आदेश जारी करत केंद्र सरकारने बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सीईओपदी  राजीव कुमार यांची नियुक्ती केली आहे.