• कोल्हापूर जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांचे आश्वासन 

कोल्हापूर / प्रतिनिधी 

कर्नाटक सरकारच्या बेळगावातील हिवाळी अधिवेशना विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीला बेळगावात महामेळावा घेण्यासाठी परवानगी नाकारल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने दि. ४ डिसेंबर २०२३ रोजी महाराष्ट्राच्या हद्दीत शिनोळी येथे तीन तास रास्तारोको करण्यात आला होता. कोणतीही पूर्व परवानगी न घेता रास्तारोको केल्याने बेळगाव - वेंगुर्ला मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी रास्तारोको करणाऱ्यांपैकी शिवसेनेच्या विजय देवणे यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदर गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन कोल्हापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिले आहे.

बुधवार दि. ६ डिसेंबर रोजी शहर महाराष्ट्र महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण - पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कोल्हापूर मुक्कामी कोल्हापूर जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेऊन सदर गुन्हे मागे घ्या अशी विनंती केली असता पोलीस अधीक्षकानी कायद्याच्या चौकटीत बसवून सदर गुन्हे मागे घेऊ असे सांगितले. 

कोल्हापूर जिल्हा पोलीस अधिक्षकांना भेटलेल्या शिष्टमंडळात शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे रणजीत चव्हाण - पाटील, बेळगाव वारकरी संघाचे अध्यक्ष शंकर बाबली , माजी नगरसेवक अनिल पाटील, जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी,  युवा कार्यकर्ते सागर पाटील, कपिल भोसले आदी उपस्थित होते.

शिवसेना नेते विजय देवणे, रा. कोल्हापुर यांच्यासह  प्रभाकर खांडेकर (रा. शिनोळी खुर्द ता.चंदगड), विक्रम मुतकेकर रा. विनायकनगर चंदगड, दिनकर पावशे, आर. एम. चौगुले, चंद्रकांत कोंडुसकर, रमाकांत कोंडुसकर, श्रीपाद आप्टेकर, शुभम शेळके, लक्ष्मण मनवाडकर, दिगंबर पाटील , नेताजी जाधव, गोपाळ देसाई,  मालोजीराव अष्टेकर, प्रकाश मरगाळे, सरिता पाटील, निखील देसाई, प्रकाश आष्टेकर, मुरलीधर पाटील, मनोहर किणेकर आदिंचा  गुन्हे दाखल केलेल्यांमध्ये समावेश आहे.