बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ के.आनंद यांच्या आत्महत्येमुळे रिक्त झालेल्या जागी बेंगळूर येथील अतिरिक्त डीईओ अजित रेड्डी यांची सीईओ म्हणून नियुक्ती झाली आहे. ते सन २०१२ च्या बॅचचे अधिकारी आहेत. बेळगावमध्ये आल्यानंतर त्यांनी ब्रिगेडियर व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष जॉयदीप मुखर्जी यांची भेट घेतली. बोर्डाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांसोबत बैठकही घेतली.
-पत्रकारांची भेट टाळल्याने नाराजी-
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रभारी सीईओपदी रुजू झालेले अजित रेड्डी यांच्या भेटीसाठी आज माध्यम प्रतिनिधी कॅन्टोन्मेंट कार्यालयात थांबून होते. मात्र सकाळी १०.४५ ते १२.४५ पर्यंत त्यांनी माध्यम प्रतिनिधींना भेटणे टाळले. तत्पूर्वी कार्यालयात जाताना ते हसत गेले. पण बैठकीनंतर परत आपल्या कार्यालयात आले असता, त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बाहेर पत्रकारांना थांबलेले पाहून पुन्हा त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांचे कान भरले यानंतरच त्यांनी पत्रकारांना भेटण्यास टाळाटाळ केली.पहिल्याच दिवशी त्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल नाराजी दिसून आली.
0 Comments