सुळगा (हिं.) दि. २९ नोव्हेंबर २०२३ : 

सुळगा (हिं.) साई कॉलनी (ता. बेळगाव) येथील प्रतिष्ठित नागरिक यल्लाप्पा लक्ष्मण कदम वय (७८) यांचे आज बुधवार दि. २९ नोव्हेंबर २०२३ रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. साई प्लायवुड या फर्मचे मालक परशराम कदम व श्रीहरी ट्रेडर्सचे मालक मल्लाप्पा कदम यांचे ते वडील होत.आज सकाळी ११.३० वा. घरातून अंत्ययात्रा निघणार आहे. अंत्यसंस्कार सुळगा (हिं.) स्मशानभूमीत होणार आहे. रक्षाविसर्जन उद्या गुरुवार    दि. ३० नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ८ वा. होणार आहे.