बेळगाव / प्रतिनिधी
मच्छे खानापूर रोड, (ता. बेळगाव) नजीक वर्दीची रिक्षा पलटी झाल्याने तीन विद्यार्थी जखमी झाले. आज दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घटना घडली.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, अपघात झाला त्यावेळी ऑटोचालक पिरनवाडी येथील शालेय विद्यार्थ्यांना घेऊन मच्छे गावाकडे चालला होता. यावेळी मच्छे - खानापूर मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात रिक्षा चालकाने ब्रेक लावला असता, रिक्षा पलटी होऊन अपघात घडल्याने तिघे विद्यार्थी जखमी झाले. यावेळी संतप्त नागरिकांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या दुचाकीची मोडतोड केली.
0 Comments