मनोहर हुंदरे चलवेनहट्टी 

चलवेनहट्टी (ता.बेळगाव) येथे सोमवार दि. २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वा. राजा पंढरीचा महिला हरिपाठ यांच्यावतीने गावातील हनुमान मंदिर (माळी) नजीक महापुजा आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्ताने सायंकाळी ५ वा.पासून महाप्रसाद अर्थात म्हमदंला सुरुवात होणार आहे. 

या महापुजेच्या औचित्याने रात्री ९ वा. मांडे येथील ह. भ. प. बाळू धामणेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी  महाप्रसाद आणि कीर्तनाचा लाभ घ्यावा,असे आवाहन राजा पंढरीचा महिला हरिपाठ यांच्यावतीने करण्यात आले आहे.