सुळगा (हिं.) / वार्ताहर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील भारत सरकारच्या महत्त्वकांक्षी उज्ज्वला योजनेअंतर्गत पश्चिम भागातील महिला लाभार्थ्यांना आज रविवार दि. २६ नोव्हेंबर २०२३ रोजी पाचव्या टप्प्यातील मोफत गॅस शेगडी सिलेंडरचे वितरण करण्यात आले. मण्णूर (ता. बेळगाव) समुदाय भवन येथे झालेल्या कार्यक्रमात शेकडो लाभार्थी महिलांना मोफत गॅस शेगडी सिलेंडर वितरित करण्यात आले.
बेळगाव ग्रामीण भाजपचे माजी अध्यक्ष विनय कदम यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पश्चिम भागातील कार्यकर्त्यांनी परिसरात जनजागृती करून या योजनेचा महिलांना लाभ मिळवून दिला आहे. खासदार मंगला अंगडी यांनी दहा हजार कुटुंबांसाठी ही योजना मंजूर करून दिली आहे. गोरगरीब जनतेसाठी ही योजना महत्त्वाची असून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.या योजनेसाठी रेशनकार्ड, कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधारकार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट साईज पाच फोटो, विद्युत बिल व मोबाईल नंबर आदि कागदपत्रांची आवश्यकता असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली.
भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष उमेश चौगुले यांनी या योजनेंतर्गत मण्णूर,आंबेवाडी, गोजगा या तिन्ही गावात आजपर्यंत ७८२ लाभार्थ्यांना मोफत गॅस शेगडी सिलेंडर वितरित केले आहेत.
- सुळगा (उ.) येथेही लाभार्थ्यांना मोफत गॅस शेगडी व सिलेंडरचे वाटप -
आज सुळगा (उ.) येथेही ग्रा.पं.सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते शट्टूप्पा (बाळू) पाटील यांनी गावातील लाभार्थ्यांना यॊजनॆचा लाभ मिळवून देताना ६० महिलांना मोफत गॅस शेगडी व सिलेंडरचे वाटप केले. याशिवाय तालुक्याच्या पश्चिम भागातील हिंडलगा, विजयनगर, बेनकनहळळी, सावगांव, हंगरगा, मंडोळी, कल्लेहोळ, तुरमुरी, बाची, उचगांव,बेकिनकेरे,अतिवाड, आंबेवाडी,गोजगा या गावातील महिला लाभार्थ्यांनीही सदर योजनेचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रकाश बेळगुंदकर यांनी केले. याप्रसंगी खासदार मंगला अंगडी, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी,बेळगाव ग्रामीण भाजपचे अध्यक्ष धनंजय जाधव, बेळगाव ग्रामीण भाजपचे माजी अध्यक्ष विनय कदम, सुळगा (उ.) ग्रा.पं.सदस्य शट्टूप्पा (बाळू) पाटील, कल्लेहोळ ग्रा. पं. सदस्य अनिल पाटील, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष सुरज पाटील, भाजपचे लक्ष्मण चोपडे, मल्लाप्पा बेळगावकर, लक्ष्मण चौगुले, निरंजन जाधव, मारुती चौगुले, रेवाणी चौगुले, मण्णूर देवस्की पंच कमिटीचे अध्यक्ष मुकुंद तरळे, मार्कंडेय सोसायटीचे संचालक तथा ज्योतिर्लिंग सोसायटीचे व्हा.चेअरमन आर.आर.चौगुले यांच्यासह मण्णूर गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- तेजस्विनी गॅस एजन्सीचे उज्ज्वला गॅस योजनेच्या अंमलबजावणीत महत्वपूर्ण योगदान -
उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक गरजू महिला लाभार्थ्यांना मोफत गॅस शेगडी सिलेंडर मिळवून देण्यासाठी तेजस्विनी गॅस एजन्सीचे मालक (प्रोपरायटर) आशिष विष्णू कालकुंद्री प्रयत्नशील आहेत. समाजसेवेच्या माध्यमातून त्यांचे हे कार्य निश्चितच उल्लेखनीय आणि प्रशंसनीय आहे. या कामात त्यांना अभिषेक आशिष कालकुंद्री, व्यवस्थापक नारायण बिष्णोई, अशोक मयेकर, रमेश जोगापगोळ, गोविंद कागलकर, सोमनाथ कुपेकर यांचे सहकार्य लाभत आहे.
0 Comments