विजयपूर / वार्ताहर 

दुचाकी चोरी प्रकरणी एकाला अटक करून त्याच्याकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या. शुक्रवार दि. २४ नोव्हेंबर २०२३ रोजी दु.१.३० वा. सुमारास मोरटगी बायपास नजीक सिंदगी केएसआरटीसी बस आगाराजवळ सिंदगी पोलिसांनी ही कारवाई केली. माळाप्पा भीमण्णा जमगी (वय २२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून १ लाख ६५ हजार रुपये किमतीच्या हिरो होंडा कंपनीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सिंदगीचे पोलीस निरीक्षक हुलगेप्पा, उपनिरीक्षक अरविंद अंगडी आणि सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार सदर आरोपी शुक्रवारी दुपारी १.३० वा. सुमारास  दुचाकीवरून जात असताना सिंदगी पोलिसांनी केएसआरटीसी बस आगारानजीक दुचाकी थांबवून त्याची चौकशी केली असता, तो दुचाकी चोर असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता. गेल्या तीन वर्षात इंडी, सिंदगी या गावांतील घरासमोर उभ्या केलेल्या दुचाकी चोरल्याची त्याने कबुली दिली. या प्रकरणाची नोंद सिंदगी पोलिस स्थानकात झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.