दिवाळी २०२३ : भारतीय संस्कृतीत दिवाळीतील पाच दिवसांना विशेष महत्त्व आहे. लक्ष्मीपूजन हा त्यातील एक दिवस. लक्ष्मीपुजनाच्या दिवशी वैशिष्टयपूर्ण पूजा असते. या दिवशी लक्ष्मीची पूजा आराधना केली जाते.शुभ मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. पण तुम्हाला यंदाच्या लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त माहिती आहे का? आज आपण त्या विषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.
लक्ष्मीपूजन मुहूर्त :
भारतीय पंचागात शुभ मुहूर्ताला विशेष महत्त्व असते. कोणतेही शुभ कार्य शुभ मुहूर्तावर करण्याची परंपरा आहे. यंदा संध्याकाळी ५.५५ ते ८:२८ पर्यंत लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे.
लक्ष्मीपूजा मंत्र खालीलप्रमाणे-
लक्ष्मीपूजा मंत्र : ‘नमस्ते सर्वदेवानां वरदाऽसि हरिप्रिये । या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात्।। धनदायै नमस्तुभ्यं निधिपद्माधिपे शुभे । भवन्तु त्वत्प्रसादेन धनधान्यादि संपदः ।।’
लक्ष्मीपूजन का करतात?
अश्विन वद्य अमावस्येला लक्ष्मी पूजन करण्याची परंपरा आहे. पण तु्म्हाला माहिती आहे का लक्ष्मीपूजन का केले जाते. या दिवशी बलीच्या बंदिवासातून लक्ष्मीची सुटका झाली होती याच आनंदात लक्ष्मीपूजन केले जाते, अशी आख्यायिका आहे.
लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरात नेहमी रहावे, त्यासाठी मनोभावे लक्ष्मीपूजन केले जाते.याच कारणामुळे व्यापारी लोकही यादिवशी त्यांच्या कामाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन करतात.
(टीप : वरील सर्व बाबी News 24 तास मराठी केवळ माहिती म्हणून वाचक - प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून News 24 तास मराठी कोणताही दावा करत नाही.)
0 Comments