बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव कुमार गंधर्व कला मंदिर येथे उद्या दि. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ या वेळेत दिव्यांगांसाठी सौर स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विनायक हेगडे यांनी आज बेळगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याप्रसंगी ते पुढे म्हणाले, गेल्या तेरा वर्षांपासून सेल्फ देशभरात कार्यरत आहे. बेरोजगार तरुणांना नोकरी देऊन समाजसेवा करत आहे. आता सौरऊर्जेद्वारे दिव्यांग (विशेष व्यक्तींच्या) उपजीविकेची सोय करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
उद्या गुरुवार दि. १६ नोव्हेंबर रोजी कुमार गंधर्व कला मंदिरात आयोजित या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांच्याहस्ते होणार आहे. सेल्फ संस्थेने आधीही अनेक विशेष व्यक्तींना स्वावलंबी जीवन जगण्यासाठी मदत केली आहे. उद्या होणाऱ्या उद्या होणाऱ्या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, सदर मेळावा पूर्णपणे मोफत असून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
0 Comments