बेळगाव / प्रतिनिधी
शासनाने बेळगाव जिल्ह्यासह राज्यातील पोलिस उपाधीक्षक आणि निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश बजावला आहे. यामध्ये राज्यातील ४० उपअधीक्षक आणि ७१ पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे.
खानापूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे उपअधीक्षक एस.डी. सत्यनायक यांची राज्य गुप्तवार्ता विभागात नियुक्ती झाली असून, त्यांच्या जागी कर्नाटक लोकायुक्त विभागाचे उपाधीक्षक निलाप्पा ओलेकार यांची नियुक्ती केली आहे. जिल्हा क्राईम रेकॉर्ड ब्युरो चे उपअधीक्षक वीरेश दोडमणी यांची सीआयडीमध्ये बदली झाली आहे.
तर पोलीस उपनिरीक्षकांमध्ये राज्य गुप्तवार्ताचे बसवराज लमानी यांची बेळगाव जिल्हा विशेष पथकात (डीएसबी) नियुक्ती झाली आहे. रायबाग पोलीस स्थानकाचे निरीक्षक हसनसाब मुल्ला यांची खानापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये बदली झाली होती, तर त्यांच्या जागी श्रीधर सतारे यांची यापूर्वी बदली झाली होती ; मात्र ती रद्द करण्यात आली असून, पोलिस निरीक्षक सतारे यांची खानापूर पोलिस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली आहे.
0 Comments