बेळगाव / प्रतिनिधी 

बिजगर्णी येथे यावर्षी लक्ष्मी यात्रा भरविण्यात येणार आहे. यासाठी बैठक घेण्यात आली होती. बैठकीमध्ये मागील लक्ष्मी यात्रोत्सवाचा हिशेब मागितल्यानंतर वादावादी झाली होती. यल्लाप्पा बेळगावकर यांना मारहाण केली अशी तक्रार बेळगाव ग्रामीण पोलिसांमध्ये झाली. त्यानंतर सहा जणांवर गुन्हा दाखल झाला होता. यामधील यापूर्वी एकाला जामीन मंजूर झाला. त्यानंतर आणखी पाच जणांना अटकपूर्व जामीन न्यायालयाने दिला आहे.

संदीप गुंडू मोरे, सुरेश निंगाप्पा मोरे, जोतिबा मोरे, बसवंत शिवाजी अष्टेकर,आदित्य गुंडूमोरे (सर्वजण  रा. बिजगर्णी) अशी अटकपूर्व जामीन मिळालेल्यांची नावे आहेत. २० ऑक्टोबर रोजी वादावादी झाली होती. त्यानंतर या सर्वांवर बेळगाव ग्रामीण पोलिस पोलीस स्थानकामध्ये  भादंवि ३०७ सह इतर कलमांसह गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी सर्वांनी अकरावे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाकडे अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला. त्याठिकाणी न्यायालयाने सर्वांना न्यायालयाने सर्वांना ५० हजार रुपयांचे वैयक्तिक हमीपत्र तितक्याच रकमेचा एक जामीनदार, ३० दिवसांच्या आत न्यायालयात हजर राहून नियमित जमीन घेण्याच्या अटींवर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. या सर्वांच्या वतीने ॲड. मारुती कामाण्णाचे हे काम पाहत आहेत.