पुणे दि. १७ नोव्हेंबर २०२३ :
उद्योगपती आणि सीरम इंडियाचे अध्यक्ष सायरल पुनावाला यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आहे. शुक्रवारी सकाळी त्यांना पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे.रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात डॉ. पुर्वेझ ग्रँट यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर ॲंजिओप्लास्टी (Angioplasty) झाल्याची माहिती आहे. सायरस पुनावाला यांची प्रकृत्ती सध्या स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
त्यानंतर आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे समोर आले आहे. रूबी हॉल क्लिनिककडून या संबंधित एक प्रसिद्धीपत्रक जरी करण्यात आले आहे. या प्रसिद्धीपत्रकाद्वारे डॉ. सायरस पूनावाला यांना १६ नोव्हेंबर २०२३ रोजी हृदयविकाराचा सौम्य इन्फार्क्ट झाला होता. त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. १७ नोव्हेंबरच्या पहाटे त्यांच्यावर डॉ. पुर्वेझ ग्रँट यांच्या देखरेखीखाली अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. सध्या डॉ. पूनावाला यांची तब्येत चांगली असून रविवारपर्यंत त्यांना डिस्चार्ज मिळेल असे कळविण्यात आले आहे.
0 Comments