- ६० हजाराची रोकड ; २० ग्रॅम सोने लंपास
बेळगाव / प्रतिनिधी
बंद घरावर डल्ला मारून चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा ऐवज लंपास केला. सदाशिवनगर बेळगाव येथे एपीएमसी पोलीस स्थानकाच्या हद्दीत शेखरगौडा मल्लनगौडा पाटील यांच्या घरी ही घटना घडली.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार शेखरगौडा मल्लनगौडा पाटील हे दि. ५ नोव्हेंबर रोजी साखरपुड्या निमित्त गोकाक येथे गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आज प्रवेश केला. यानंतर घराच्या तिजोरीतील ६०,००० रुपयांची रोख रक्कम आणि २० ग्रॅम सोन्याचे दागिने असा आवाज लंपास करून चोरटे पसार झाले.
दरम्यान घरमालक शेखरगौडा मल्लनगौडा पाटील गोकाकहून परतल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने त्यांनी एपीएमसी पोलीस स्थानकात चोरीची तक्रार दाखल केली. घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलिस श्वान पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी श्वान पथकाच्या साह्याने चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. याशिवाय ठसे तज्ञांनी घटनास्थळावरील ठसे ही घेतले आहेत. या घटनेची नोंद एपीएमसी पोलीस स्थानकात झाली एपीएमसी पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहे.
0 Comments