बेळगाव / प्रतिनिधी 

बेंगळूर येथे नुकत्याच झालेल्या ३९ व्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत खुशी एकनाथ अगसीमणी हिने यश संपादन केले आहे. तिने आर्टिस्टिक रोलर स्केटिंग सोलो, फ्री स्टाईल आणि फिगर स्केटिंगमध्ये तीन रौप्य पदके प्राप्त केली आहेत.


 दि. १५ ते २५ डिसेंबर दरम्यान चेन्नई येथे होणाऱ्या ६१ व्या राष्ट्रीय खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी खुशी पात्र ठरली आहे. सदर स्पर्धेत बेळगावतून खुशीच्या रूपाने एकमेव खेळाडू सहभाग घेणार आहे. तिला सूर्यकांत हिंडलगेकर, विठ्ठल गगणे, पिक्किली करुणाकर (नायडू), पिक्किली वासुदेव कुमार नायडू यांचे प्रशिक्षण लाभले आहे.