मडगाव / प्रतिनिधी
यावर्षी नाताळ सणादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वे मार्गावर सहा विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार गाडी क्र. ०११५१ मुंबई सीएसएमटी - थिवी विशेष (दैनिक) गाडी २२ डिसेंबर ते २ जानेवारी २०२४ पर्यंत मुंबई येथून दररोज ००.२० वाजता सुटेल व त्याच दिवशी १४.०० वाजता थिवीला पोहोचेल. गाडी क्र. ०११५२ थिवी- मुंबई सीएसएमटी विशेष (दैनिक) गाडी थिवी येथून २२ डिसेंबर २०२३ ते २ जानेवारी २०२४ पर्यंत दररोज १५.०० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी ०३.५० वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल. ही २२ डब्यांची गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि पेडणे स्थानकांवर थांबेल.
गाडी क्र. ०१४४५ पुणे जं. - करमळी विशेष (साप्ताहिक) पुणे जंक्शन येथून शुक्रवार, २२ डिसेंबर आणि २९ डिसेंबर रोजी १७.३० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता करमळीला पोहोचेल. गाडी क्र. ०१४४६ करमळी - पुणे जं. विशेष (साप्ताहिक) रविवार, २४ आणि ३१ डिसेंबर रोजी करमळी येथून ०९.२० वाजता सुटेल व त्याच दिवशी २३.३५ वाजता पुणे जंक्शनला पोहोचेल. २२ डब्यांची ही गाडी लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवी स्थानकांवर थांबेल.
गाडी क्र. ०१४४८ करमळी - पनवेल विशेष (साप्ताहिक) गाडी शनिवार, २३ व ३० डिसेंबर रोजी करमळी येथून ०९.२० वाजता सुटेल व त्याच दिवशी २०.१५ वाजता पनवेलला पोहोचेल.
गाडी क्र. ०१४४७ पनवेल - करमाळी विशेष (साप्ताहिक) गाडी शनिवार, २३ व ३० डिसेंबर रोजी पनवेल येथून २२.०० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता करमाळीला पोहोचेल. ही गाडी थिवी, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड आणि रोहा स्थानकावर गाडी थांबेल. वरील गाड्यांचे तपशीलवार थांबे आणि वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in वर पाहावे किंवा एनटीईएस अॅपवर माहिती घेत प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आलेली आहे.
0 Comments